धरणगाव पोटनिवडणूक; उमेदवारांना चिन्ह वाटप

election news

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीसाठी माघारी अंती सात उमेदवारी रिंगणात उभे आहे. आज सातही उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांचा उद्यापासून प्रचाराचा नारळ फुटणार आहे. यासंदर्भात आज सायंकाळी प्रत्येक पक्षाची पुर्वनियोजन बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे.

हे उमेदवार रिंगणात
1. निलेश भागवत चौधरी (राष्ट्रवादी)- घड्याळ
2. निलेश सुरेश चौधरी (शिवसेना) – धनुष्यबाण
3. महेंद्र सुभाष पाटील (अपक्ष) – हॅट
4. उमेश जानकीराम माळी (अपक्ष) – कपबशी
5. मधुकर बन्सी माळी (भाजप)- कमळ
6. संजय एकनाथ माळी (अपक्ष) – छताचा पंखा
7. हाजी शेख इब्राहीम अब्दुल रसुल (अपक्ष) – टेबल लॅप

धरणगाव नगराध्यपक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर मतमोजणी व निकाल 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरूवात होणार आहे.

Protected Content