फैजपूरात मास्क न वापरणाऱ्या १५ जणांवर दंडात्मक कारवाई

फैजपूर प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून मास्क वापरणे सक्ती करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात मास्क न वापरणाऱ्या १५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत ६ हजार १०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

यात सोशल डिस्टन्सिंग न पाळे, मास्क न लावणे, विनाकारण बाहेर फिरणे, मोटार वाहन कायद्याचे नियम मोडणे यासाठी ५०० रूपयांचा दंड अश्या १५ जणांकडून ६ हजार १०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई पीएसआय रोहिदास ठोंबरे यांनी केली आहे.

कोरोनाचा संजर्ग आजार रोखण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी मास्क न वापरणे सोशल डिस्टन्सिंग न पाळणे याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाला काही नागरिक केराची टोपली दाखवून बिनधास्त फिरतांना दिसत आले. डिवायएसपी नरेंद्र पिंगळे, प्रभारी एपीआय राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रोहिदास ठोंबरे व पोलीस कॉन्स्टेबल बाळू भोई यांनी ही कारवाई केली.

Protected Content