चोपड्यात दहा लाखांचा गुटखा जप्त

seized guthka

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील लासूर ते सत्रासेन रस्त्यावर रात्री तब्बल दहा लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, चोपडा ग्रामिण पोलिसांनी सापळा रचून लासुर – सत्रासेन रस्त्यावर मध्यप्रदेशातून येणार्‍या टाटा कंपनीची ४०७ ( एमएच-१९ एस- १७६१ ) या नंबरच्या गाडीत ८,९७००० रुपयांचा विमल पान मसाल्याचे ४८०० पॉकीट, तसेच १,१२२०० रुपयांचा व्हि-१- तंबाखू व सुंगधीत तंबाखूचे ४४०० पॉकीट असा एकूण १०,०९००० रुपयांचा माल पकडला. या गाडीवर कांतीलाल राजेंद्र पाटील (ड्रायव्हर ) रा.अकुलखेडा ता.चोपडा , गजानन शिवाजी पाटील, (क्लिन्नर ), रा. चोपडा हे होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार ग्रामिण पोलीस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक संदीप आराक मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. राजू महाजन, पो.हे.कॉ भरत नाईक, पो.कॉ. विष्णु भिल, पो.कॉ. सुनिल कोळी,पो.नाईक रितेश चौधरी यांनी केली आहे. यानंतर कायदेशीर कारवाईसाठी अन्न सुरक्षा विभागाकडे हा माल सोपविण्यात आला अन्न सुरक्षा विभागाचे सहा.आयुक्त वाय.के.बेडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती एस. डी. महाजन, किशोर साळुंखे यांनी हा माल ताब्यात घेतला आहे. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही ग्रामीण पोलीस स्टेशनची ह्या कारवाईने सर्वत्र कौतुक होत आहे तरी हा माल कुणाचा ? हा माल कुठ्न आणि कोणी आणला? या गाडीवरील ड्रायव्हर, क्लिनर असुन सुद्धा याचा खरा मालक कोण? यांचा खरा सूत्रधार कोण ? शहरात अनेक वेळा माल सापडतो आणि मालाचा मालक का सापडत नाही ? चोपड्यात खुलेआम गुटखा विक्री होत असते शेकडो वाहनातून गुटख्याची देवाण-घेवाण होत असते अनेक जण गुटखा न विकण्याचा आव आणता परंतु त्यांच्या येथे गुटखा मिळतो त्यांच्यावर का ? पायबंद लागत नाही असा सवाल ही शहरातील नागरिक करत आहेत.

Protected Content