चिनावल येथील दोन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील चिनावल येथील दोन जणांच्या स्वॅब सँपलचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून यामुळे येथे कोविड-१९ विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याचे स्पष्ट झाले आहे.

रावेर तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत चालल्याचे आता दिसून येत आहे. रावेर व सावदा शहरांसह ग्रामीण भागातही या विषाणूची बाधा आढळून येत आहे. यात आज तालुक्यातील चिनावल या गावात दोन जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहेत. याआधी गावातील एक रूग्ण कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले होते. यानंतर आता दोन जण पॉझिटीव्ह आल्यामुळे चिनावल येथील कोरोना बाधीतांची संख्या आता तीन झालेली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया झोपे यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला असून बाधीतांचा रहिवास असणारा परिसर सील करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

Protected Content