प.वि.पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।    महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ‘जागरूक पालक सुदृढ बालक’ हे अभियान ” 9 फेब्रुवारी पासून राबविण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यालय येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जळगांव च्या पथकामार्फत एकूण 714 विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यात विद्यार्थ्यांचे डोळे , दात तसेच इतर सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली.

 

 

सदर तपासणी जळगांव जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत करण्यात आली त्यात ज्या विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या अडचणी आहेत , काही आजार आहेत त्याविषयी औषधोपचार सुचविण्यात आले तर काहींना पुढील उपचारासाठी वैद्यकीय सल्ला देण्यात आला.तसेच काहींना पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जळगांव येथे येण्याचा सल्ला देण्यात आला. सदर तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय झोपे , डॉ. उमेश पाटील ,डॉ. मनीष महाजन , डॉ.लोकेश चौधरी , डॉ.प्रीती नारखेडे ,डॉ.श्रुती चौधरी ,डॉ. लिना बडगुजर , डॉ.पंकज कुलकर्णी( औषध निर्माण अधिकारी) तसेच परिचारिका दिप्ती वावीकर आणि जयश्री चौधरी यांच्या पथकामार्फत करण्यात आली. प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्माचारी उपस्थित होते.

Protected Content