अभिषेक पाटील उद्या भरणार अर्ज

jalgaon news 1

जळगाव प्रतिनिधी । जळगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक पाटील ४ ऑक्टोबर रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्‍या यादीत जळगाव शहर मतदारसंघातून अभिषेक पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. ते राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष म्हणून कार्यरत असून आता ते आमदार राजूमामा भोळे यांना आव्हान देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी अभिषेक पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी, काँग्रेस, पीआरपी तसेच मित्रपक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Protected Content