मुक्ताईनगरमध्ये खडसे समर्थकांकडून रास्तारोको आंदोलन (व्हीडीओ)

1c99d0e2 7bc2 494b 83fd e42114f5fb60

 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आज रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

आज दुपारी जेव्हा खडसे यांनी आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी समर्थकांनी रास्ता रोको या भाजप पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर व रावेर तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या तालुकास्तरीय काही पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचे कळते. तर दुसरीकडे ना. गिरीश महाजन यांनी कदाचित तिसऱ्या यादीत खडसे यांचे नाव असू शकते, असे म्हटले आहे.

Protected Content