गुरुवर्य प.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भारतीय स्वातंत्रदिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील व ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक राष्ट्रगीत गायन सकाळी 11वाजता शाळेत प्रांगणात घेण्यात आले.

प्रसंगी उपशिक्षक योगेश भालेराव यांनी हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिये या गीताचेही गायन केले. राष्ट्रगीतासाठी शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी , मुख्या.प्रणिता झांबरे , मुख्या.रेखा पाटील पर्यवेक्षक नरेंद्र पालवे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content