आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्षपदी सूर्यकांत कदम

 

चाळीसगाव, प्रतिनिधी  ।  देशभरातील विविध दैनिकात कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या संघटनांना एकत्रित करून देशपातळीवर प्रभावी संघटना निर्माण करण्याच्या उद्देशाने आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशन हि संघटना पुढे आली असून यात चाळीसगाव येथील दैनिक भास्करचे तालुका प्रतिनिधी सुर्यकांत कदम यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकारांची संघटना एकत्रित करून देशपातळीवर प्रभावी संघटना निर्माण करण्याच्या उद्देशाने हि संघटना पुढे आली आहे. नुकतीच आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशनचे महराष्ट्र प्रभारी अजयकुमार मिश्रा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद वाचस्पती व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रमोद झा (नवी दिल्ली) यांच्या आदेशाने चाळीसगाव येथील दैनिक भास्करचे तालुका प्रतिनिधी सुर्यकांत कदम यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. याबाबत सर्व स्तरातून कदम यांचे कौतुक होत आहे. आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशनचे देशातील प्रत्येक राज्यात जाळे पसरलेले आहे. विविध दैनिकात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन संघटनाने त्यांना विविध पदांवर नुकतीच नियुक्ती  केली आहे. त्यात चाळीसगाव येथील दैनिक भास्करचे तालुका प्रतिनिधी सुर्यकांत कदम यांची  जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Protected Content