…नाहीतर कचरा नगर परिषदेत आणून टाकू : मनसेचा इशारा

 

यावल,  प्रतिनिधी ।  येथील  प्रसिद्ध असलेले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान महर्षी श्री व्यास महाराज यांच्या पावन चरणाच्या स्पर्शाने पवित्र झालेली भूमीतील मंदीर परिसर दुर्गंधीयुक्त पाणी व सांडपाण्याच्या विळख्यात सापडला असून हा परिसर नगर परिषेदेने स्वच्छ करावा अन्यथा मंदिर परीसारतील कचरा नगर परिषदेत आणून टाकू असा इशारा  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आला आहे.

काही भाविकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर विभाग जिल्हाध्यक्ष  चेतन अढळकर यांची भेट  घेवुन महर्षी श्री व्यास महाराज मंदीर परिसरातील अस्वच्छतेबाबत तक्रारी केल्या. दरम्यान श्री. अढळकर यांनी नागरिक व भाविकांनी केलेल्या तक्रारची दखल घेत नगर परिषदचे शहर स्वच्छता निरिक्षक शिवानंद कानडे यांची तात्काळ भेट घेवुन परिस्थितीची जाणीव करून दिली असता श्री.  कानडे यांनी येत्या दोन दिवसात संपूर्ण  मंदीर परिसर स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले.  दरम्यान, दोन दिवसात स्वच्छता न झाल्यास महर्षी श्री व्यास महाराज मंदिर परीसारतील सर्व कचरा नगर परिषदेत आणून टाकण्यात येईल  असा इशारा  श्री.  अढळकर यांनी  दिला आहे.

 

Protected Content