अभ्यासक्रम पूर्ण तर सुटी

मुंबई, लाइव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – उन्हाळ्याच्या सुट्या रद्द करीत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने फिरवला आहे. अभ्यासक्रम पूर्ण होऊन परीक्षा झालेल्या शाळांना सुटी घेता येणार असल्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकार व शिक्षण विभागाकडून १ ली ते ९ वी तसेच ११ वी चे वर्ग एप्रिल अखेर सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात येऊन शाळांना सुट्या नसल्याचे निर्देश देण्यात आले होते. १ ली ते ९ वी तसेच ११ वी च्या वर्गाच्या परीक्षा एप्रिल अखेर घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. या निर्णयावरून स्थानिक पालकांसह शिक्षण विभाग प्रशासनाकडून संताप तसेच आश्चर्य व्यक्त केले जात होते. वास्तविक स्थानिक स्तरावर शालेय प्रशासनाकडून ९ वीसह अन्य परीक्षा सुरु असून इतर वर्गाच्या वार्षिक परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सुट्यांचे देखील नियोजन केले जात होते. परंतु शिक्षण विभागाकडून आलेल्या निर्णयाचा पालकांसह स्थानिक स्तरावरून संताप व्यक्त केला जात होता.
कोरोना संसर्गामुळे काही शाळांचा अभ्यासक्रम अपूर्ण आहे, किंवा अभ्यासक्रम पूर्ण करू शकलेल्या नाहीत या शाळांसाठी ते निर्देश देण्यात आलेले आहेत. ज्या शाळांचे अभ्यासक्रम पूर्ण झाले आहेत, त्यांच्या सुट्यांमध्ये कोणताही फरक नाही असे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी म्हटले आहे.

Protected Content