विद्यापीठाच्या सर्व जागांवर भगवा फडकवा – वरूण सरदेसाई (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी काळात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सीनेट सदस्यांनी निवडणूक होत आहे. या निवडणूकीत मुंबई विद्यापीठाप्रमाणे सर्वच्या सर्व जागांवर शिवसेनेचा भगवा फडकवा. असे आवाहन युवासेनेचे प्रदेश सचिव वरूण सरदेसाई यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज युवासेनेच्या वतीने युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘युवासेना निश्चय मेळावा’ घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

 

ते पुढे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची लोकप्रियता वाढल्याने भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतू सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहे. उध्दव ठाकरे हे अनेक सर्व्हेक्षणांमध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्री ठरले असून महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे वाटचाल करत आहे. यामुळे भाजपने आता आघाडीच्या नेत्यांना तपास यंत्रणांचा वापर केला असून हा दबावाचा शेवटचा प्रयत्न असल्याची टीका युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी केली. महाराष्ट्र राज्यात राज्यात १५ ते ३० एप्रिलच्या दरम्यान युवासेनेची सदस्य नोंदणी सुरूवात होणार आहे. सदस्य नोंदणी अभियानाला यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मनोगतात बोलतांना सरदेसाई यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. रशिया युक्रेण युध्दाप्रसंगी युक्रेणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यावरून भाजपने राजकारण केले. खरोखर सर्व अडकलेले विद्यार्थी भारतात परतलेत का ? असा प्रश्नही वरूण सरदेसाई यांनी उपस्थित केला. रशिया व  युक्रेन या दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष मोदींना विचारणा करतात त्यावरून मोदींचा जगात कीती प्रभाव आहे असे वातावरण निर्मीतीही भाजपकडून केली जात असल्याची टिका त्यांनी केली.

 

या मेळाव्याला शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, महापौर जयश्रीताई महाजन, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील,  आमदार लताताई सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जि.प.सदस्य पवन सोनवणे, प्रतापराव पाटील, नगरसेवक गणेश सोनवणे, प्रितेश ठाकूर, यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content