Home Cities चोपडा मासूम रहमान तडवी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

मासूम रहमान तडवी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

0
100

masum tadavi

चोपडा प्रतिनिधी | चोपडा विधानसभा मतदार संघासाठी मासूम रहमान तडवी यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज (दि.3) निवडणूक निर्णय आधिकारी शुभांगी भारदे यांच्याकडे दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मासूम रहमान तडवी हे 20 वर्षे मोहरद गावाचे सरपंच राहिले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील त्यांनी कारकीर्द गाजविली आहे. अर्ज दाखल करतांना त्यांच्यासोबत राजू पवार, विजय पाटील, शामराव पाटील, सतीलाल पाटील, शब्बीर तडवी, मुस्तफा तडवी, राजू तडवी, साहेबराव पाटील, विकास पाटील, फिरोज तडवी, अरमान तडवी, वजीर तडवी, गुलशन तडवी, सुभेदार तडवी, धना पाटील यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound