खडसेंसोबत तावडे आणि मेहता यांचाही पत्ता कट

082ada6d bc40 49ba b0ba 90dedbb0d14b

 

मुंबई (वृत्तसंस्था) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यासह कुलाबा आमदार राज पुरोहित यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

 

भाजपाची उमेदवारांची चौथी यादी आज (गुरूवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर घाटकोपर पूर्वमधून प्रकाश महेता यांचा पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्या जागी पराग शाह यांना संधी देण्यात आली आहे. तर कुलाब्यामधून राज पुरोहित यांच्या जागी रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बोरिवलीमध्येही विनोद तावडेंचा पत्ता कट केला आहे. तावडे यांच्याऐवजी सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, तावडे यांना विधानपरिषदेवर घेण्याचे आश्वासन दिल्याचे कळते.

Protected Content