वाढीव मोबदल्यासाठी कागदपत्रे दाखल करण्यासाठी मुदतवाढ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी तथा लवाद भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयात वाढीव मोबदला मिळण्याबाबत आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी १३ ऑक्टोंबर मुदतवाढ देण्यात आली आहे.  अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी तथा लवाद भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयात वाढीव मोबदला मिळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांकानुसार लवाद संदर्भ दाखल केलेले आहेत. दाखल संदर्भात लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, पुराव्याची कागदपत्र व अंतीम कैफीयत २९ सप्टेंबरपर्यंत  दाखल करावीत. असे नोटीसीद्वारे कळविण्यात आले होते.

लवाद संदर्भ दाखल केलेले व्यक्तींनी आपल्या अर्जाची एक प्रत प्रतिवादी, सामनेवाला यांना देऊन त्यांच्या पोहोच पावतीसह रजिस्टर्ड पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने अथवा समक्ष इकडेस सादर करावे. अन्यथा आपले काहीएक म्हणणे नाही. असे समजण्यात येईल व गुणवत्तेवर निर्णय घेण्याकामी सदरचा संदर्भ बंद करण्यात येईल. ही मुदतवाढ आपले म्हणणे, कागदपत्रे दाखल करणेसाठी देण्यात येत असून, प्रकरणपरत्वे सुनावणीबाबत आपणांस नंतर कळविण्यात येईल. याची नोंद घेण्यात यावी. असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Protected Content