अंनिसच्या चमत्कार सादरीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर

जळगाव, प्रतिनिधी । गणेश दूग्धप्राशन चमत्काराला या वर्षी २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यंदा चमत्कारांचा पर्दाफाश करणाऱ्या सादरीकरणांची ऑनलाईन व्हिडीओ राज्यव्यापी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या निकालाची घोषणा अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे.

या स्पर्धेसाठी कार्यकर्ता, कार्यकर्त्याचे कुटुंबीय सदस्य आणि इतर असे तीन गट करण्यात आले होते. कार्यकर्ता गटास अपेक्षित प्रतिसाद होताच. पण खऱ्या अर्थाने आश्वासक वाटला तो कार्यकर्त्याचे कुटुंबीय सदस्य हा गट. विशेषतः यातील तरुण पिढीही कार्यकर्त्याच्या विचारकक्षेत वैज्ञानिक दृष्टिकोन समजून, रुजवून घेत आहे, हे महत्वाचे वाटते. या गटात विशेषतः शाळकरी मुलींचा उत्साह आणि आत्मविश्वास कौतुकास्पद वाटला.

अशा प्रकारच्या या पहिल्याच स्पर्धेसाठी उत्तम प्रतिसाद मिळत एकूण ९० व्हिडीओज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते.

ऑनलाईन चमत्कार सादरीकरण राज्य स्तरीय स्पर्धा २०२० निकाल पुढीलप्रमाणे
( स्पर्धकाचे नाव / पत्ता / प्रयोगाचे नाव )

 कार्यकर्ताचे कुटुंबिय गट :
प्रथम – आनंदी जाधव (इ.४थी) (नाशिक) -प्रश्नचिन्हाची करामत गुरुत्व मध्याच्या साह्याने

द्वितीय- अमूर चैताली शिंदे, ठाणे (इ.८वी) – पेटता कापूर खाणे.
तृतीय- तन्वी सुषमा परेश (धुळे)- काळी बाहुली नाचविणे- भूताचा खेळ संपविणे

उत्तेजनार्थ- सई भोसले (सोलापूर)- मंत्राने अग्नी पेटविणे
उत्तेजनार्थ- विश्वा शेलार (भिवंडी) – रिकाम्या हातातून नोटा काढणे

 अंनिस कार्यकर्ता गट :
प्रथम- अतुल सवाखंडे (चाकण ) – कोंबडी संमोहित करणे
द्वितीय- चंद्रकांत शिंदे (सांगली)- साखळीत रिंग अडकवून बाहेर काढणे
तृतीय- भास्कर सदाकळे (तासगांव)- रिकाम्या हातातून कुंकू काढणे

उत्तेजनार्थ- किशोर पाटील (टिटवाळा) – कमंडलू मधून गंगा काढणे-
उत्तेजनार्थ- दत्ता बोंबे (कल्याण) – अतींद्रिय शक्तीने क्रूस उभा करणे-
उत्तेजनार्थ -आशा धनाले (मिरज)- पंचगव्याची पॉवर-

 इतर खुला गट
उत्तेजनार्थ- तेजस्विनी योगेश (नाशिक)- हळदीचे कुंकू करणे
उत्तेजनार्थ- धनराज रघुनाथ (चंद्रपूर)- काड्यापेटीच्या काड्यांची निर्मिती

या स्पर्धेचे परिक्षक म्हणून चित्रपट नाटय परिक्षक डॉ. अनमोल कोढाडिया, कोल्हापूर व अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी काम पाहिले, तर स्पर्धेचे संयोजन अंनिसचे राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत, सुरेखा भापकर, डॉ. ठकसेन गोराणे,श्रेयस भारूले, अवधूत कांबळे यांनी केले

Protected Content