आजपासून अग्निशमन सेवा साप्ताहाचा प्रारंभ (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने आयोजित ‘अग्निशमन सेवा साप्ताह’ चे उद्घाटन महापौर जयश्री माहाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

 

अग्निशमन विभागाच्या वतीने ‘शिका अग्नि सुरक्षितता वाढवा जनजागृती या ब्रीदला अनुसरून ‘अग्निशमन सेवा साप्ताह’ १४ ते २० एप्रिल २०२२ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात या साप्ताहाचा प्रारंभ महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, उपायुक्त पवन पाटील, उपायुक्त श्याम गोसावी,अग्निशमन अधिकारी शशीकांत बारी, सहा. अग्निशमन अधिकारी सुनील मोरे आदी उपस्थित होते. यावेळी अग्निशमन विभागातर्फे साहित्य प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट देवून त्याची पाहणी करून साहित्याची माहिती जाणून घेतली. महापौर व उपमहापौर यांनी अग्निशमन विभागाच्या कामाचे कौतुक केले. ‘अग्निशमन सेवा साप्ताह’ जनजागृती करण्यात येणार असल्याने नागरिकांनी अग्नी पासून सुरक्षित कसे राहावे याबाबत मार्गदर्शन केले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/331460005635081

 

Protected Content