जिन्सी येथे सिमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार

simet bandhare kam 1

रावेर प्रतिनिधी ।  रावेर तालुक्यात आदिवासी भागातील जिन्सी येथे सुरू असलेले सिमेंट बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून, त्याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.

याबाबत माहिती अशी की, आधीच दुष्काळाने हैराण झालेल्या भागात जलयुक्त शिवार व जलसंधारणसारख्या योजना अमलात आणल्या जात आहेत. त्यावर कोट्यवधी रुपये पाणी अडवण्यासाठी खर्च केले जात आहेत. ही कामे करणारे ठेकेदार मात्र या बंधाऱ्याच्या कामात निकृष्ट वाळू व कमी प्रमाणात सिमेंटचा वापर करून बांधकाम करीत आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यांचा दर्जा निकृष्ट राहणार असून पाणी साठवणाची क्षमता अपेक्षित राहणार नाही. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.

Protected Content