भुसावळात नव्या वीज मीटरमुळे ग्राहकांची लूट होत असल्याची तक्रार (व्हिडीओ)

bhusaval 1

भुसावळ प्रतिनिधी । विद्युत महावितरण विभागाने परिसरात नव्यानेच वीज मीटर लावण्यात आले आहे. मात्र हे मीटर लावण्यापासून मीटर बिल अधिक प्रमाणात येत असल्यामूळे, आज (दि.19 जून) रोजी ग्राहकांनी उत्तर महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्यावतीने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, महावितरण विभागाने परिसरात नव्यानेच वीज मीटर लावण्यात आले आहे. यामुळे वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे. तसेच ग्राहकांच्या दैनंदिन वापरापेक्षा रेडींग अधिक प्रमाणात फिरत आहे. परंतू महावितरण विभागाने नवीन मीटरची कुठलीही चाचणी न करता आर्थिक फायद्याच्या दृष्टीने नवीन मीटर खरेदी केले असून, स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेची आर्थिक पिळवणूक महावितरण करत असल्याचा आरोप यावेळी उत्तर महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेने केला आहे. मात्र हे नवीन मीटर काढून त्वरित जुने मीटर लावावे व तोपर्यंत ग्राहकांना कोणत्याही प्रकारची आकारणी करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

Protected Content