भरडधान्य खरेदीसाठी १७ केंद्र होणार कार्यान्वित

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात रब्बी हंगामातील भरडधान्य खरेदीसाठी पणन हंगाम रब्बी २०२१-२२ अंतर्गत १७ केंद्र कार्यान्वित केली जाणार आहेत. शेतकऱ्यांनी नजीकच्या केंद्रावर ३० एप्रिल पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात किमान आधारभूत किमत खरेदी योजनेनुसार रब्बी हंगामातील भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ११ एप्रिल पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर तालुका खरेदी विक्री संघ, एरंडोल, जामनेर, पाचोरा भडगाव, पारोळा, चाळीसगाव, शेतकरी सहकारी संघ, बोदवड को-ऑप परचेस सेल युनियन, जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संस्था, कै. अण्णासाहेब साहेबराव पाटील फ्रुट्सेल सोसा, पाळधी(धरणगाव), कोरपावली विकासो ता. यावल, शेंदुर्णी शेतकरी सह. जिनिंग प्रेसिंग अशा १७ केंद्रावर भरडधान्य खरेदी केली जाणार आहे.

शेतकऱ्यांनी भरडधान्य नोंद असलेल्या सध्यस्थिती ७/१२ उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक आदी आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स घेऊन त्यांच्या नजीकच्या केंद्रावर ३० एप्रिल दरम्यान भरडधान्य खरेदीची ऑनलाईन नोंदणी करावी.

 गजानन मगरे,  जिल्हा विपणन अधिकारी

Protected Content