सावद्यात भगवान महावीर जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भगवान महावीर यांच्या २६२१ व्या जयंतीनिमित्त सावदा जैन समाजातर्फे शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.

भगवंतांचा सकाळी मंदीरामध्ये महामस्तका अभिषेक करून पालखीला सुरूवात झाली. सावद्याच्या मुख्य रस्तांनी मिरवणुक संपन्न होऊन मंदीरामध्ये परत अभिषेक पुजन व आरती करण्यात आली. संध्याकाळी  मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रसंगी उपस्थीत सावदा जैन समाज्याचे अध्यक्ष नरेंद्र जैन, सचिव  रविंद्र जैन, टस्टी दिलीप मिटकर डॉ. दिपक जैन व युवक अध्यक्ष अभिजीत मिटकर, विजय जैन, केतन जैन, वैभव जैन, अशिष सैतवाल, सुभाष मिटकर, संजय मिटकर, करण मिटकर, योगेश घोडके, विमलेश जैन, किरण दहिकर, सागर पांडव, आकाश मिटकर, गोलू जैन व सर्व समाज बांधव महिला व पुरूष उपस्थितीत होते.

 

Protected Content