कोविड सेंटरमध्ये शाकाहारी जेवणात मटणाचे तुकडे

पैठण, वृत्तसंस्था । तालुक्यातील चितेगाव येथील कोविड सेंटरमध्ये जेवणात मटणाचे तुकडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाअसून रुग्णामध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले आहे.

नेहमीप्रमाणे बुधवारी चितेगाव येथील रुग्णांना रात्री शाकाहारी जेवण देण्यात आले. तालुक्यातील केकत जळगाव येथील माळकरी महिला रात्रीचे जेवण करताना त्यांना भाजीमध्ये चक्क मटणाचे तुकडे आढळले. शाकाहारी जेवणात मटणाचे तुकडे असल्याचे उघड झाल्यानंतर चितेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या शाकाहारी रुग्णामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या रुग्णांनी, चितेगाव कोविड केअर सेंटरमध्ये घोषणाबाजी केली. चितेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये माझा भाऊ दाखल असून तो पूर्णपणे शाकाहारी आहे. बुधवारी रात्री देण्यात आलेल्या जेवणात मटणाचे तुकडे आढळल्यानंतर त्याला धक्का बसला असून या गंभीर प्रकारांची चौकशी करण्याची मागणी डॉ. संजय तांबे यांनी केली आहे.

Protected Content