सतत स्वरूप बदलणाऱ्या कोरोनाला रोखणे कठीण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । भारतात कोरोनाचा संसर्ग अतिशय तीव्र गतीने वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनावर लस कधी येईल, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. लस आल्याशिवाय लोकांचे जीवन रुळावर येणार नाही हे स्पष्ट आहे. मात्र, तज्ज्ञांनी अभ्यासात कोरोना विषाणूचे सतत बदलते स्वरुप पाहिलेले आहे. हा अतिशय चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना विषाणू सतत आपले स्वरुप बदलत राहिला, तर लशीच्या काम करण्यावर त्याचा परिणाम होईल आणि लस निघाली तरी ती या विषाणूचा संसर्ग रोखू शकणार नाही.

SARS-CoV-2 हा विषाणू Covid-19 मुळे तयार होतो असे जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनावरील लेखातून स्पष्ट झाले आहे. या विषाणूच्या ‘स्पाइक प्रोटीन’मध्ये अनेक बदल झालेले आहेत. या प्रोटीनमुळेच या विषाणूला मानवी कोशिकांमध्ये घुसखोरी करण्याची क्षमता मिळते. या विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर संसर्ग पसरवणे सुरू करतो. त्यानंतर अनेक समस्या तयार होतात.

जर्नल ऑफ लॅबोरेटरी फिजिशियनच्या अहवालातील माहिती १,३२५ जीनेम, १,६०४ स्पाइक प्रोटीन आणि २७९ आंशिक स्पाइक प्रोटीनच्या विश्लेषणावर आधारित होती. हे चाचणीचे नमुने १ मेपर्यंत अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनमध्ये ठेवण्यात आले. तेथेच त्यावर संशोधन करण्यात आले. या स्पाइक प्रोटीनमध्ये १२ म्यूटेशन सापडल्याची माहिती या संशोधनाचे प्रमुख डॉ. सरमन सिंह यांनी म्हटले आहे. यात ६ नॉव्हेल म्यूटेशन होते. Indian strain (MT012098.1) विषाणूच्या संक्रमणात देखील अनुवंशिक बदल आढळले.

अमेरिकेत SARS-CoV-2 च्या जीनोममधून मिळालेल्या प्राइक प्रोटीनमध्ये अधिकांश अनुवंशिक बदल पाहायला मिळाले . हा विषाणू वेगेगळ्या प्रकारच्या वातावरणात संपर्कात आल्यानंतर स्वतःच्या अनुवंशिक संरचनेत बदल घडवतो असे स्पष्ट झाले असल्याचे सिंह म्हणाले. हा बदल देखील तीव्र गतीने होत आहे. मात्र यामुळे या संसर्गाच्या प्रसारावर किती परिणाम होतो हे सांगता येत नसल्याचे सिंह म्हणाले.

Protected Content