योगी सरकारवर छळाचा डॉ . काफील खान यांचा आरोप

मथुरा वृत्तसंस्था । उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती गोविंद माथुर यांच्या खंडपीठानं डॉ. कफील यांच्यावर योगी आदित्यनाथ सरकारकडून लावण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा रद्द करण्याचे आदेश दिले. सुटकेनंतर डॉ. कफील खान यांनी न्यायपालिकेचे आभार मानतानाच योगी सरकारवर छळासह गंभीर आरोप केले आहेत.

‘कफील खान यांचं भाषण कोणत्याही अर्थानं द्वेषपूर्ण किंवा दंगल घडवून आणणारं नव्हतं. कफील खान यांच्या भाषणामुळे अलीगढमध्ये शांती व्यवस्थेला कोणताही धोका नाही’ असं म्हणत डॉ. खान यांच्यावरील रासुका रद्द करण्याचे व त्यांच्या सुटकेचे आदेश न्यायालयाकडून दिले गेले होते. आदेशानंतर खान यांचे नातेवाईक त्यांच्या सुटकेसाठी मथुरा तुरुंगात दाखल झाले. परंतु, अधिकाऱ्यांनी आदेश न मिळाल्याचं सांगत खान यांना सोडण्यास नकार दिला.

आठ महिने तुरुंगात घालवल्यानंतर जामीन
सायंकाळपर्यंत अलीगढ जिल्हा प्रशासनाकडून सुटकेसंबंधी कोणतेही आदेश मथुरा तुरुंगात पाठवले गेले नव्हते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत डॉ. कफील खान यांची सुटका होत नव्हती. मध्य रात्री मथुरा तुरुंगात पोहचलेल्या सुटकेच्या आदेशानंतर डॉ. कफील खान यांची सुटका करण्यात आली.

मी उत्तर प्रदेश एसटीएफ चे आभार मानतो की त्यांनी मुंबईहून मथुरा आणताना एन्काऊन्टरमध्ये मला मारलं नाही . अशी उद्वेगजनक प्रतिक्रिया त्यानंतर डॉ. कफील खान यांनी व्यक्त केली

Protected Content