जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

 

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि हतनुर धरणाची पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरीकांनी दक्षात घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकात म्हटले आहे की, भारतीय हवामान खाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासात अरबी समुद्र, लक्षद्विपमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. तर मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर क्षेत्रात हवामान खात्याने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवलेली असल्याने ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान ताशी ३० ते ४० किलोमीटर वादळी वारा व विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातही अवकाळी पाऊ व तापीनदीवरील पाण्याची पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, तर अवकाळी पावसात नागरीकांनी सुरक्षित ठिकाणी सोडू नये अश्या सुचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी दिलेल्या प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.

Protected Content