केजरीवालांच्या घरावर हल्ला : भाजपवर आरोप

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर एका जमावाने हल्ला केला असून यामागे भाजपचा हात असल्याचा थेट आरोप मनीष शिसोदिया यांनी केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरंविद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाला असून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, काही अराजकतावादी लोकांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आहे. त्या ठिकाणी उउढत कॅमेरा आणि सिक्योरिटी बॅरियरची तोडफोड केली आहे. याशिवाय गेटवरील बूम बॅरियर देखील तोडले आहेत.

मनीष सिसोदिया यांनी आरोप केलाय की, भाजपच्या गुंडांना अरविंद केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली आहे. इतकचं नव्हे तर त्यांनी पुढे म्हटलंय की, भाजपचे पोलिस त्यांना अडवण्याऐवजी त्यांना दरवाजापर्यंत घेऊनच आली आहे. शिसोदिया यांनी या प्रकरणी भाजपवर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत भाजप युवा मोर्चाचे आंदोलन सुरु होते. यामध्ये आंदोलकांनी गोंधळ घातला. सीसीटीव्हीवर देखील हल्ला केला. मुख्यमंत्र्यांच्या घराबाबेर भगवा रंग देखील फेकला आहे. पोलिसांनी ५० जणांना ताब्यात घेतलं आहे. सध्या जमावाला पांगवण्यात आलं आहे.

 

Protected Content