दाऊद हवा : जिंदा या मुर्दा !- एनआयएने जाहीर केली बक्षिसे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसाठी एनआयएने आता रोख पारितोषीके जाहीर केली आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडून देणार्‍या व्यक्तीला २५ लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. यासोबत त्याच्या सहकार्‍यांवरही रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. तपास यंत्रणांनी दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम ऊर्फ हजी अनीस, दाऊदचा जवळचा सहकारी जावेद पटेल ऊर्फ जावेद चिकना, शकील शेख ऊर्फ छोटा शकील यांच्यासोबतच इब्राहिम मुश्ताक अब्दुल रझाक मेमन ऊर्फ टायगर मेमन यांना पकडून देणार्‍यांसाठीही बक्षीसाची घोषणा केली आहे. दाऊदला पकडून देणार्‍याला २५ लाख, छोटा शकीलला पकडून देणार्‍याला २० लाख तर अनीस, चिकना आणि मेननला पकडून देणार्‍याल प्रत्येकी १५ लाख रुपये बक्षीस दिलं जाणार असल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.

मुंबईमध्ये १९९३ साली झालेले साखळी बॉम्बस्फोटांबरोबरच शस्त्रास्त्रांची तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, बनावट नोटा प्रकरण, दहशतवादी हल्ले अशा अनेक गुन्ह्यांमध्ये दाऊद हा आरोपी आहे. दाऊद सध्या पाकिस्तानमधील कराचीत वास्तव्यास आहे. लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हफीस सईद, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझर, हिजबुल मुजाहिद्दीनचा संस्थापक सैयद सलाहुद्दीन आणि अब्दुल रौफ असगर या मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीत दाऊदचाही समावेश आहे.

Protected Content