ऋषिपंचमीनिमित्त संत नगरीत भाविकांची मांदियाळी 

 

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गण गण गणात बोतेच्या गजरात विदर्भ पंढरी संतनगरी शेगावात संत गजानन महाराज संस्थान मध्ये 112 वा पुण्यतिथी (ऋषी पंचमी उत्सव) उत्साहात साजरा होत आहे.

आठवड्याभरा पासून भाविक ,भजनी दिंड्यांचा संतनगरीत दाखल होत असून भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या यागाची पूर्ण होती आज गुरुवारी होत आहे. दुपारी पालखी परिक्रमा होणार आहे. श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त श्री गजानन महाराज संस्थान मध्ये श्री गणेश याग, हरिकीर्तन प्रवचन यास विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. भजनी दिंड्यांचे येणे जाणे सुरू असल्याने सगळी टाळ मृदुंगाचा निनाद गजाननाचे नामस्मरण भगव्या पताका भाविक यांची वर्दळ यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

श्रींच्या पुण्यतिथी ऋषिपंच निमित्त आज गुरुवार रोजी दर्शनार्थी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून श्री गजानन महाराज संस्थान कडून कलश दर्शन, मुखदर्शन, समाधी दर्शन, पारायण महाप्रसादाला या विविध सोयी उपलब्ध करून दिले आहेत. गर्दी मध्ये अप्रिय घटना टाळणे साठी संस्थांच्या परिसरात एकेरी मार्ग ,सूचनाफलक लावले आहेत. ठिकठिकाणी श्रींचे गणवेश धारी सेवेकरी भक्तांना मार्गदर्शन करताना सज्ज राहणार आहे. एकंदरीत हा संपूर्ण दिवसभर गण गण गणात बोते गजरात संत नगरी नाहून निघणार आहे.

Protected Content