नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा कारण सर्व सेटींग झाली-आदित्य ठाकरे

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आलीये. नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा करायची कारण सर्व काही सेटिंग झालीये, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिलीये.

विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रात शिवसेना हा पक्ष कोणाचा, यावर निर्णय दिला. यामध्ये पक्षाची घटना, नेतृत्वाची रचना आणि विधिमंडळ पक्ष याचा विचार करण्यात आला. निवडणूक आयोगात असलेली शिवसेनेची घटना ही ग्राह्य धरण्यात आली.

शिवसेनेच्या घटनेतील बदल हे निवडणूक आयोगातील घटनेत आढळले नसल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले. 2018 मध्ये पक्ष घटनेत झालेले बदल निवडणूक आयोगाकडे नसल्याचेही विधानसभा अध्यक्षांनी म्हटले. त्यामुळे खरी शिवसेना ही शिंदेंची असल्याचा निर्णय राहुल नार्वेकरांनी दिला.

Protected Content