शिंदे गटाच्या निकालाप्रमाणे अजित गटाचा निकाल लागण्याची दाट शक्यता

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर आता अजित पवार गटाच्या भवितव्याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. ताजा निकाल अजित पवार गटासाठी दिशादर्शक असेल असं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रावादी काँग्रेसच्या दोन गटांपैकी अजित पवार गटाला अध्यक्षांकडून झुकते माप मिळू शकते.

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाचा निकाल जानेवारी महिन्याच्या शेवटापर्यंत देण्याचे निर्देश दिले आहेत. राहुल नार्वेकर यांनी सुद्धा ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे सुतोवात केले आहेत. शिंदे गटाच्या निकालाप्रमाणे अजित पवार गटाचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार गटाला हा मोठा दिलासा असल्याचं बोललं जातंय.

एकनाथ शिंदे हे ज्याप्रमाणे शिवसेनेतून फुटून बाहेर आले, त्याप्रमाणे अजित पवार हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार गटाने आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तसेच अजित पवार गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आलाय. शिंदेंच्या शिवसेनेप्रमाणेच ही स्थिती आहे. त्यामुळे आजच्या निकालाचा आधार घेऊन अजित पवार गटाचा देखील निकाल लागू शकतो.

Protected Content