अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना साखरखेडा येथील घडली आहे. तलावात अंघोळ करण्याचा मोह आवरला नाही आणि पोहण्यासाठी तरूण तलावात उतरला होता.

गणेश बाबुराव दानवे असे मयत तरुणाचे नाव आहे.

साखरखेडा गावातीलच एका वृध्द महिलेच्या अंत्यसंस्कारसाठी या तलावाजवळील स्मशानभूमीत गणेश गेला होता. मात्र अंत्यसंस्कार झाल्यावर त्याला या तलावात अंघोळ करण्याचा मोह आवरला नाही आणि पोहण्यासाठी तो तलावात उतरला. यावेळी काही युवकांनी त्याला विरोधही केला. परंतु कुणाचेही न ऐकता सरळ तो तलावात काही अंतरावर चालत गेला. आपण सहज पुढच्या काठावर जाऊ शकतो, असा भ्रम त्याला झाला असावा आणि तलावाच्या मधोमध जात नाही तोच गणेश पाण्यात बुडाला. तलावाची पातळी खोलवर असल्याने शोध घेऊनही तो सापडला नाही. गेल्या तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे घटनेच्या दिवशी गणेशचा मृतदेह तलावात सापडला नव्हता. एनडीआरएफच्या टीमने शोध मोहिम राबवत तरूणाचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.

Protected Content