सामाजिक जाणिवेतून दीपस्तंभच्या मनोबल प्रकल्पास मदत करत जपल्या वडिलांच्या स्मृती

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी आपले वडिल  स्व.आबासाहेब कौतिकराव बोरसे यांच्या  १६ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अनाठायी खर्च टाळत जळगाव येथील दिव्यांग, अनाथ आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलच्या प्रकल्पास २१ हजार रुपये देणगी दिली आहे.

 

बुधवार   दि.१३ जून रोजी दीपस्तंभ मनोबल प्रकल्पात सायंकाळी प्रार्थनेच्याप्रसंगी देणगी भेट देण्याचा  छोटीखानी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांशी सवांद साधताना प्रतापराव पाटील असे म्हणाले की, आई वडील आपले प्रथम गुरु असतात. आज गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी माझ्या वडिलांची १६  वी पुण्यतिथी आहे. माझ्या वडिलांनी अत्यंत संघर्षातून आणि कष्टातून आम्हाला सर्व भावंडांना चांगले शिक्षण आणि संस्कार दिलेत. त्यांनी दिलेल्या संस्कारातूनच सामाजिक बांधिलकी जोपासत मनोबलसाठी ही मदत आम्ही केली आहे. मनोबलच्या माध्यमातून आमच्या सारख्यांनाही  प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते. भविष्यातही आम्ही कायम मनोबल प्रकल्पातील विद्यार्थ्यांसोबत असणार आहोत.

याप्रसंगी लेखाधिकारी के. बी. सोनार, संजय पाटील, निलेश चौधरी, रुपेश महाजन, कामिनी धांडे, सुनील चौधरी, अनिकेत पवार, इरफान पिंजारी, दीपस्तंभचे संचालक आर. डी. पाटील, सम्राट माळवदकर आणि मनोबलचे सर्व विदयार्थी उपस्थित होते.

 

Protected Content