Home Cities जळगाव गद्दारांचा मुखवटा फाडायला आलोय : आदित्य ठाकरेंची गर्जना

गद्दारांचा मुखवटा फाडायला आलोय : आदित्य ठाकरेंची गर्जना

0
136

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा दौर्‍यास जल्लोषात सुरूवात झाली असून त्यांनी बंडखोरांवर तोफ डागली आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी विमानतळावर आगमन झाले असता महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, दीपकसिंग राजपूत, गजानन मालपुरे आदींसह पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आपण गद्दारांचा मुखवटा फाडण्यासाठी आणि जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तर गद्दार हे गद्दारच असतात असा टोला देखील त्यांनी मारला. याप्रसंगी आदित्य ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे नेते आदेश बांदेकर, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत हे देखील उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. अजिंठा चौफुली येथे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांचा ताफा आकाशवाणी चौकाकडे वळला. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर येथेच युवासेना आणि शिवसेनेच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. महापौर जयश्रीताई महाजन यांनी त्यांना चांदीची तलवार भेट दिली. तर इतर पदाधिकार्‍यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांचा ताफा पाचोरा येथे जाण्यासाठी रवाना झाला.

 

 


Protected Content

Play sound