Home राजकीय एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार

एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार

0
80

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात आपल्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लागलीच ऍक्शन मोडवरून कामकाजाला सुरूवात केली होती. मात्र त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळलेला नव्हता. या पार्श्‍वभूमिवर, आज त्यांनी मंत्रालयात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या कॅबिनमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. आज ते मंत्रालयात दाखल झाल्यानंतर कर्मचार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. काही महिला कर्मचार्‍यांनी त्यांचे औक्षण केले. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखील उपस्थिती होती.

एकनाथ शिंदे आज कार्यभार स्वीकारल्यानंतर लागलीच काही महत्वाच्या बैठका घेणार आहेत. यातच सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमिवर, ते राज्यातील आपत्ती निवारण कक्षाशी सातत्याने संवाद साधत आहेत. तर, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज महत्वाची बैठक घेणार असून यात मंत्रीमंडळाबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.


Protected Content

Play sound