जामनेरात अतिक्रमण काढतांना वाद ; काही काळ तणावाचे वातावरण (व्हिडीओ)

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जामनेर नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्यातर्फे शहरात अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

गेल्या महिन्याभरापूर्वी जामनेर शहरातील मुख्य रस्ते व भाजी मार्केटमधील अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबत वेळोवेळी नगरपालिकेतर्फे हात गाडी भाजीपाला व फळ विक्रेते यांना सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करत होते.  नगरपालिका चौक, गांधी चौक व भाजी मार्केटमध्ये हात गाडी भाजी विक्रेते हे रस्त्याच्या मधोमध गाड्या लावून भाजीपाला विक्री करत होते. यामुळे  याठिकाणाहून वापरणाऱ्या वाहनधारकांना व पायी चालणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत पुन्हा तक्रारी येऊ लागल्याने आज मंगळवार  दि.  ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गांधी चौक, भाजीपाला मार्केट व मुख्य रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांवर पोलीस व नगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली. यावेळी भाजीपाला विक्रेत्यांचे हातगाड्या भाजीपाला व साहित्य नगरपालिकेने जमा केले. अचानक पोलीस व नगरपालिका कर्मचारी अतिक्रणधारकांवर कारवाई करत आल्यामुळे काही काळ पळापळ झाली.  ही त्याचबरोबर यावेळी भाजीपाला विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यासाठी आलेले पोलीस निरीक्षक किरण शिंदे व भाजीपाला विक्रेते महिला यांच्यात वाद झाला. यावेळी एका भाजीपाला विक्रेत्या महिलेचे नातेवाईक या ठिकाणी आले व त्यांनी पोलीस निरीक्षकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी सदर भाजीपाला विक्रेता महिला व नातेवाईकांना या ठिकाणाहून जाण्याच्या सांगितले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हि कारवाई करतांना  पोलीस निरीक्षक किरण शिंदे, नगरपालिका मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले, उपमुख्य अधिकारी दुर्गेश सोनवणे, सुरज पाटील,  श्री. डेगे यांच्यासह नगरपालिका अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर मोठा पोलीस फौज फाटा उपस्थित होता.

Protected Content