राज्यात सत्ता परिवर्तन होणार- डॉ. कुंदन फेगडे

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राज्याच्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाच आमदारांचा विजय झाल्याने येत्या काही दिवसांत सत्ता परिवर्तन होणार असल्याचे भाकीत डॉ. कुंदन फेगडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्यातील काल पार पडलेल्या विधान परिषदच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडे पुर्ण संख्याबळ नसतांना ही सर्व पाच ही आमदारांचा दणदणीत विजय झाल्याने यावल शहरात भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, डॉ. कुंदन फेगडे, भाजपा सेल ओबीसीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु फेगडे, किशोर कुलकर्णी, विजय मोरे, बबलु घारू , योगेश चौधरी, भुषण फेगडे, व्यंक्टेश बारी, स्नेहल फिरके, परीष नाईक यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पक्षाच्या संपर्क व यावल शहरातील भुसावळ टी पाँईट वर फटाक्यांची आतिषबाजी करून विजयाचा जल्लोष साजरा केला.

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!