ठेवीदार कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा महिला ठेवीदार कृती समिती व खान्देश ठेवीदार कृती समितीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता निदर्शने करण्यात आले. प्रलंबित विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या वतीने जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. परंतू जळगाव जिल्ह्यातील ठेवीदारांनी २००७ पासून लोकशाही दिनी आपल्या तक्रारी शासन दरबारी दाखल करण्यात आलेल्या आहे. त्यापैकी २५ टक्के ठेवीदारांना लोकशाही दिनातील अर्जाच्या अनुषंगाने फक्त उत्तरे मिळाली. या तक्रारीकडे जिल्हा प्रशासन व सहकार विभागाकडून कोणतही कारवाई करण्यात आलेली नाही. संस्थेकडून रक्कम वसूल करून ठेवीदारांना पैसे आजपर्यंत देण्यात आलेले नाही. ठेवीदाराना त्याची रक्कम मुद्दल व व्याजासह देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. २००७ पासून ठेवीच्या रकमा परत मिळावी या मागणीसाठी जळगाव जिल्हा महिला ठेवीदार कृती समिती व खान्देश ठेवीदार कृती समितीने रविवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन कृती समितीचे अध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांनी दिले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/767584291215043

Protected Content