उत्कृष्ट अध्ययनासोबत अध्यापन देखील महत्वाचे – प्रा. बी.एन. केसूर 

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | विद्यार्थी म्हणून आपण रोजच्या जीवनात काहीतरी शिकत असतो. मात्र उत्कृष्ट शिक्षक होण्यासाठी चांगले अध्यापन आणि त्यासोबत अध्यापन देखील तितकेच महत्वाचे आहे असे विचार प्रा.बी.एन केसूर यांनी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात मांडले.

के.सी.ई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमूख वक्ता म्हणून ते उपस्थित होते.

पुढे बोलतांना केसूर म्हणाले की आजचे युग तंत्रज्ञानाचे असल्याने हवी ती माहिती चटकन उपलब्ध होत आहे. यामुळे मोलाची भर ही ज्ञानात अधिकच पडली आहे असेही त्यांनी विद्यार्थी संवादात सांगितले.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. आर राणे, उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी,प्रा. रंजना सोनवणे आदी उपस्थित होते.

प्राचार्य ए. आर राणे यांनी अध्यक्षीय मनोगतात अष्टपैलू शिक्षक कसा असावा याबद्दल भावी विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक प्रा.रंजना सोनवणे तर सूत्रसंचालन गायत्री शिंदे, प्रियंका चौधरी तर आभार लोकेंद्रनाथ खांजोडकर यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रंथपाल मनीष वनकर, प्रा, रामलाल शिंगाने, शैलजा भंगाळे, कुंदा बाविस्कर, वंदना चौधरी, जयश्री पाटील, सुनीता नेमाडे, किसन पावरा, गणेश पाटील, पंकज पाटील, प्रवीण कोल्हे,अतुल गोरडे, मोहन चौधरी, निलेश नाईक, शैलेश कुलकर्णी, निलेश सदाफळे, विजय चव्हाण, संजय जुमनाके, प्रा. संदीप केदार, प्रा.केतकी सोनार आदी उपस्थित होते.

Protected Content