जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघासाठी 176 उमेदवारांचे 279 अर्ज दाखल

Electronic voting machine

 

जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्याआजच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघासाठी 176 उमेदवारांनी 279 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.

आज नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या व नामनिर्देशनपत्रांची संख्या पुढीलप्रमाणे – चोपडा विधानसभा मतदार संघात अकरा उमेदवारानी अठरा अर्ज, रावेर विधानसभा मतदार संघात तेरा उमेदवारांनी सोळा अर्ज, भुसावळ मतदार संघात सोळा उमेदवारांनी अठरा अर्ज, जळगाव शहर मतदार संघात पंधरा उमेदवारांनी वीस अर्ज, जळगाव ग्रामीण मतदार संघात बारा उमेदवारांनी एकोणावीस अर्ज, अमळनेर विधानसभा मतदार संघात सात उमेदवारानी नऊ, एरंडोल मतदार संघात आठ उमेदवाराने तेरा अर्ज, चाळीसगाव मतदार संघात दहा उमेदवारांनी सतरा अर्ज, पाचोरा मतदार संघात पाच उमेदवारांनी सहा अर्ज, जामनेर मतदार संघात पंधरा उमेदवारांनी वीस अर्ज, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात बारा उमेदवारानी सतरा अर्ज. असे एकूण 108 उमेदवारांनी 173 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.

जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघासाठी आजपर्यंत नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या व नामनिर्देशनपत्रांची संख्या पुढीलप्रमाणे –
चोपडा विधानसभा मतदार संघात एकोणावीस उमेदवारानी एकोणतीस अर्ज, रावेर विधानसभा मतदार संघात सोळा उमेदवारांनी पंचवीस अर्ज, भुसावळ मतदार संघात बावीस उमेदवारांनी छत्तीस अर्ज, जळगाव शहर मतदार संघात चोवीस उमेदवारांनी अडोतीस अर्ज, जळगाव ग्रामीण मतदार संघात सोळा उमेदवारांनी सव्वीस अर्ज,अमळनेर विधानसभा मतदार संघात अकरा उमेदवारानी सोळा अर्ज.

एरंडोल मतदार संघात नऊ उमेदवाराने सतरा अर्ज, चाळीसगाव मतदार संघात सोळा उमेदवारांनी सत्तावीस अर्ज, पाचोरा मतदार संघात नऊ उमेदवारांनी तेरा अर्ज, जामनेर मतदार संघात वीस उमेदवारांनी एकतीस अर्ज, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात चौदा उमेदवारानी एकवीस अर्ज, असे एकूण 176 उमेदवारांनी 279 नामनिर्देशनपत्र दाखल केले असल्याची माहिती सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

Protected Content