चिदंबरम यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ

 

p.chidambaram

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

 

आयएनएक्स घोटाळा प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सीबीआयच्या कोठडीत असताना त्यांना शेवटच्या दिवशी अर्थात 26 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर करण्यात आले. यामध्ये सीबीआय कोर्टात त्यांच्याविरोधात सविस्तर चौकशी करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मागण्यात आली. त्यानंतर सीबीआयला आणखी 4 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Protected Content