आरोग्य व शिक्षण समिती सभापती रविंद्र पाटील यांच्या हस्ते शवपेट्यांचे लोकार्पण

 

यावल,  प्रतिनिधी  ।  जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रविंद्र उर्फ छोटु पाटील यांच्या प्रयत्नातुन नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत गटातील पाच गावांना  आज  गुरुवार ६ मे रोजी  शवपेटयांचे लोकापर्ण कोरपावली ग्रामपंचायत येथे  करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदच्या डीपीडीसीच्या नाविन्यपुर्ण योजनेद्वारे चुंचाळे – बोराळे , दहिगाव , टाकरखेडा , थोरगव्हाण आणि कोरपावली या पाच गावांना प्रत्येकी सुमारे ७५ हजार रुपये किमतीची अशा पाच शवपेटया जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रविन्द्र पाटील यांच्या हस्ते देण्यात आल्यात.  येथील कोरपावली ग्रामपंचायतच्या कार्यालयात आयोजीत या शवपेटी लोकार्पण कार्यक्रमास सरपंच विलास नारायण अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी , आरीफ तडवी , अफरोज पटेल , सिकंदर तडवी , कविता तुळशीराम कोंळबे , जुम्मा तडवी , नागो तायडे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे , सामाजीक कार्यकर्त मुक्तार पिरण पटेल , जेष्ठ मार्गदर्शक पिरण पटेल, नारायण अडकमोल ग्रामसेवक प्रविण सपकाळे यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा शवपेटी लोकार्पण कार्यक्रम पार पडले या प्रसंगी सभापती रविन्द्र पाटील यांनी केलेल्या सामाजीक व विधायक कार्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल सरपंच विलास अडकमोल यांनी विशेष आभार मानले.

Protected Content