यावल नगर परिषदच्या आगामी पंचवार्षिक निवडणुक प्रारूप प्रभाग रचना जाहीर

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील होवू घातलेल्या आगामी नगरपरिषद निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना गुरुवारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी जाहीर केली आहे. सूचना हरकती घेण्याच्या पहिल्या दिवशी एकही हरकत वा सूचना प्राप्त झालेली नसल्याचे नगर परिषदच्या सूत्रांनी सांगितले.

यावल येथील नगरपरिषदच्या निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना गुरुवारी येथील प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडी यांनी येथील नगरपरिषद कार्यालय, शहर तलाठी कार्यालय व तहसील कार्यालयासह पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली असून पहील्या दिवशी एकही सुचना/हरकत नगर परिषद प्रशासनास प्राप्त नाही.

आगामी पंचवार्षीक निवडणुकीसाठी प्रारुप रचने नुसार शहरात अकरा प्रभाग करण्यात आले आहेत. त्या अनुसार एक प्रभागाची वाढ झाली असून येणाऱ्या आगामी निवडणुकीनंतर यावल नगर परिषदच्या सदस्यांची संख्या २३ राहणार आहे. गेल्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत या वेळीची नगरसेवक सदस्य संख्या तीन ने वाढली आहे. यामध्ये अनुसूचित जाती., अनु. जमाती राखीवमधून प्रत्येकी एक-एक महीला आरक्षणासह दोन-दोन जागा तर खुल्या प्रवर्गातील १० महीला आरक्षणासह १९ जागा खुल्या प्रवर्गात राहतील. अशा एकूण २३ नगरसेवक सदस्य संख्या राहणार आहे.

यावल नगर परिषदच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकांची संख्या ही वीस होती यावेळेस मात्र तीन जागा वाढल्याने संख्या २३ झाली असून, नगराध्यक्षपदाची निवड ही नगरसेवकातून होणार आहे . प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती मांगविण्याची शेवटची मुदत ही १७ मार्च पर्यंत करण्यात आली आहे.

Protected Content