जळगावात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सभेचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने शनिवार दि. १२ मार्च रोजी बळीराम पेठेतील पत्रकार भवनात सहविचार सभा व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डी.डी. पाटील यांनी बळीराम पेठेतील पत्रकार भवनात पत्रकार परिषदेत माहिती दिली.

गुरूवार १० मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत डी.डी. पाटील म्हणाले की, “जळगाव शहरातील बळीराम पेठ येथील पत्रकार भवनात शनिवार १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, राष्ट्रीय युवक अध्यक्ष सुभाषराव घाटे, सहसचिव शरदराव वारखेडे, महासचिव राजेश काकडे, प्रदेश संघटक कैलास चौधरी, विभागीय अध्यक्ष भटूअप्पा नेरकर, जिल्हाध्यक्ष डी.डी. पाटील, भगवान करनकाळ यांच्यासह धुळे जिल्ह्यातील कार्यकारिणीतील सदस्यांची उपस्थिती राहणार आहे.

जळगाव जिल्ह्यात ओबीसी बांधवांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या निवड झालेल्या पदाधिकाऱ्याचा पदग्रहन सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डी.डी. पाटील यांनी माहिती दिली.

Protected Content