….त्या ‘पी.आय’ला सपोर्ट का मिळतोय ? – आ.चंद्रकांत पाटलांचा विधानसभेत सवाल (व्हिडीओ)

मुक्ताईनगर, पंकज कपले | मुक्ताईनगर, कुऱ्हा, बोदवड आणि परिसरात दिवसेंदिवस खून, दरोडे, पत्ता, सट्टा, जुगार यासारखी गुन्हेगारी आणि अवैध दारू विक्रीचं प्रमाणही वाढत चाललं आहे. मात्र या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देत नसलेल्या पोलीस निरीक्षकांवर अधिकाऱ्यांवर काही कारवाई होईल का ? त्या ‘पी.आय’ला सपोर्ट का मिळतोय ? असा प्रश्न विधानसभेत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघाची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असल्याचं विधान आमदार यांनी केलं. ते म्हणाले, “जळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागातल्या मतदारसंघ असून या मतदारसंघाला जिल्ह्यामध्ये चे कुणी हद्दपार होतात, मोक्कामध्ये जातात अशी सर्व लोक मुक्ताईनगरमध्ये येऊन थांबतात. मुक्ताईनगरच्या तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण जास्त झाले. कायद्याचा जरब राहिला नाही. मुख्य नगर शहराचा तालुक्याचा भौगोलिक परिसर पाहिला तर आदिवासी पाडे, जंगल असा मुक्ताईनगर परिसर आहे.
मुक्ताईनगरच्या कुऱ्हा या भागांमध्ये मधापुरी, हलकी या भागात आदिवासी लोकांकडून बाहेरच्या लोकांना नागमणी, मांडूळ जातीचा साप अशा संदर्भात बोलून त्या लोकांची फसवणूक होते. यामध्ये काही लोकांचे जीव गेले आहेत. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी अशाच पद्धतीने काही लोकांना तिथे बोलवले गेले. त्यांना मारहाण झाली. मात्र मुक्ताईनगर पोलीसांनी त्याची दखल घेतली नाही. गुन्हा दाखल केला नाही.

मारहाण झालेला व्यक्ती नांदुरामध्ये वारला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर दखल गुन्हा दाखल झाला असून शून्य या क्रमांकाने मुक्ताईनगरला वर्ग करण्यात आला.

आरोपी अटक झालेले फरार झाले. त्यानंतर १० ऑक्टोबर २०२१ रोजी जयस्वाल यांच्या घरात जबरी चोरी झाली. ते गुन्हेगार अजून मिळाले नाहीत. मुक्तानगरपासून पाचशे किलोमीटर अंतरावर कोथळी गावात अकरा तारखेला जबरी चोरी झाली. तिथे त्यातील आरोपींना अटक नाही. एमआयडीसी पोलिसांनी तेथिल समाजाच्या लोकांमध्ये आपला खबरी टाकलेला होता. त्या लोकांनी दरोडा टाकला.

मुक्ताईनगर बऱ्हाणपूर या सीमाकडे जात असताना गावकऱ्यांच्या समयसूचकतेने आरोपी पकडण्यात आला. मात्र यात पोलीसांचा खबरी असताना दरोडा टाकला. मात्र पोलीसांचे पौलिसी अर्थपूर्ण पद्ध्तीने अतिशय चुकीच्या मार्गाने चाललली आहे असा आरोप त्यांनी केला.

अशी परिस्थिती आहे की प्रत्येक माणसाला घराबाहेर पडायला भीती वाटू लागली आहे. बनावट दारूचा महापूर मुक्ताईनगरात आहे. पाचशे मीटर अंतरावर येथे अफगानी खात्याने बनावट दारु पकडली. दोन लाख रुपयाचा माल हस्तगत केला होता. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला किंवा पोलीसांनी माहिती असूनही अर्थप्रधान संबंधातून अशा प्रकारचे बनावट दारू किंवा त्या संदर्भातल्या कारवाई सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव यांच्या पथकाने दारूचा बनावट दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला हे होत असताना मुक्तानगर पीआय काही करत नाही मात्र जळगाव पोलीस कारवाई करतात. सरकारी खात्यात कारवाई करताना मुक्ताईनगर पोलीस याकडे अर्थापूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शासनाने याकडे लक्ष वेधून अशा ‘पी.आय’ ला कोणत्या माध्यमातून आपण सपोर्ट करता आहेत ? बदली का करत नाही ? किंवा त्यांच्यावर कारवाई का करत नाही ? किमान कारवाई का करण्यात असं पत्र आले का ? असा प्रश्न विचारण्यात आला. आणि संबंधित अधिकारी व यंत्रणेवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती केली.

व्हिडीओ लिंक :
https://fb.watch/bFSxnteg7x/

Protected Content