डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ञांनी दिले तरुणास जीवदान

जळगाव प्रतिनिधी । सिकलसेल, थॅलेसेमिया आणि कावीळ या आजाराने ग्रस्त असलेल्या १९ वर्षीय तरुणास शहरातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मेडिसीन विभागातील तज्ज्ञांनी यशस्वी उपचार करत जीवदान दिले आहे. 

याबाबत माहिती अशी की जळगाव येथील १९ वर्षीय विनायक माळी यास जन्मापासून सिकलसेल थॅलेसेमियाग्रस्त आजाराने त्रस्त असूनही फार्मसीचे शिक्षण घेत असतांना अचानक एके दिवशी अंग, पोटदुखी, थकवा, ताप आणि काविळ झाल्याने रूग्णालयात दाखल झाला. यावेळी त्याला उठता बसता देखिल येत नव्हते. येथे आल्यावर फिजिशियन डॉ. पाराजी यांनी प्राथमिक तपासणीसोबत रक्‍त, लघवी चाचण्या देखिल करण्यात आल्यात. चाचण्यामध्ये हिमोग्लोबिन ४ तर काविळ १४ एम.जी इतके प्रमाण आढळून आले. 

डॉ. पाराजी व डॉ. आदित्य हयांनी रूग्णांची पुर्व माहिती घेत उपचाराची दिशा ठरवतांना नातेवाईकांना परिस्थीतीची जाणीव करून देत ताबडतोब हायड्रोक्स्युरीया औषध व रक्‍ताचा पुरवठी करण्यात आला. तब्बल ४ रक्‍ताच्या पिशव्या व २४ तास या रूग्णांची काळजी घेतांना दरोरोज रक्‍त, लघवी व चाचण्यामधून हिमोग्लोबिन आणि काविळ नियंत्रणात येत असल्याची चिन्हे दिसू लागली. १० व्या दिवशी रूग्ण ठणठणीत झाल्यानंतर फार्मसीची ऑनलाईन परिक्षा देखिल त्याने वार्डातूनच दिली. डॉ. पाराजी बाचेवार, डॉ. आदित्य यांना डॉ. आसावरी देशपांडे, डॉ. साक्षी देशमुख, डॉ रेबिका बारडोसकर, यांनी सहकार्य केले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवून देत रूग्णावर मोफत उपचार करण्यात आले.

ताबडतोब व योग्य उपचाराने यश — डॉ. पाराजी

अत्यंत जिवघेणा हा आजार असून यावर अदयापतरी औषध उपलब्ध नाही. आजारात रक्‍तपेशी २० ते ३० दिवस जिंवत राहतात. त्यामूळै रोगप्रकिार शक्‍ती कमी होउन जंतूसंसर्ग, रक्‍ताक्षय, अत्यायुषी वक्राकार पेशीमूळे मेंदु, डोळे, फुफुस्स, हदय, यकृत, मुत्रपिंड, सांधे व हाडांचे विविध आजार उदभवून वेदना सहन कराव्या लागतात. प्राणवायुच्या अपुऱ्‍या पुरवठयाने अल्पायुष्यात रूग्ण दगावण्याची शक्यता असते. रूग्णालयात वेळेत रूग्ण दाखल झाला तर योग्य व ताबडतोब उपचाराने रूग्णांस जिवदान मिळू शकते असे डॉ. पाराजी बाचेवार यांनी सांगीतले.

 

Protected Content