Home क्राईम सावदा येथे शांतता कमिटीची बैठक; पो.नि. इंगोले यांचे मार्गदर्शन

सावदा येथे शांतता कमिटीची बैठक; पो.नि. इंगोले यांचे मार्गदर्शन


सावदा ता. रावेर प्रतिनिधी । त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सावदा पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी पो.नि. देविदास इंगोले यांनी मार्गदर्शन केले.

 

त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे पडसाद संपुर्ण देशात उमटले आहे. या पार्श्वभूमीवर सावदा पोलीस ठाण्याच्या सभागृहात मंगळवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी सावदा सह परिसरातील ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याची राखण्यात यावी,  अफवांवर विश्वास ठेवू नये अशा सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड, नगरसेवक फिरोज खान पठाण, शिवसेना प्रसिद्धीप्रमुख मिलिंद पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी नागरीकांना शांतता ठेवण्याबाबत ग्वाही दिली.  या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शहराध्यक्ष कुशल जावळे, भरत नेहते, प्रवीण पाटील, श्याम पाटील, अख्तर शेख रहमान, सचिन बऱ्हाटे, शकील बशीर, इरफान शेख सय्यद, बशीर, स्वप्नील पाटील, मोहन पाटील, शेख नाजिम यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound