नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावे; कोरपावली सरपंच अडकमोल यांचे आवाहन

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली गावात १८ वर्ष पुर्ण झालेल्या नवतरूणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन सरपंच विलास अडकमोल यांनी मतदार जनजागृतीच्या माध्यमातून केले आहे. यावेळी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

आयोजित केलेल्या ग्रामसभेत मतदार यादी वाचन करणे, गावातील १८ वर्ष पुर्ण झालेल्या नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती देण्यात आली. मयत झालेल्या व्यक्तींचे नावे कमी करण, नवात बदल करणे, मतदार यादीत नाव आहे की नाही याची तपासणी करणे याची माहिती बीएलओ दिलीप पाटील यांनी दिली. तलाठी मुकेश तायडे यांनी सचिव म्हणून काम पाहिले.

 

यावेळी विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विलास अडकमोल होते. यावेळी प्रामुख्याने उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, माजी सरपंच जलील पटेल, सभेचे सचिव तलाठी मुकेश तायडे, समाजसेवक मुक्तार पटेल, बीएलओ दिलीप पाटील, भिरुड, कोरपावली ग्रामपंचायतीचे सदस्य दीपक नेहेते, अफरोज पटेल, आरिफ तडवी, ग्राम पंचायत सदस्या भारती नेहेते, कविता कोलंबे, सपना जावळे, यावल महसुलचे कर्मचारी कय्युम पटेल, बबलू महाजन, ग्रामपंचायत कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी, युवा सामाजीक कार्यकर्ते, मुक्तार पिरण पटेल,

ग्रामस्थ आकाश अडकमोल, रईस पटेल, गफ्फार तडवी उपस्थित होते. कोरपावली गावातील व परिसरातील १८ वर्ष वय पुर्ण झालेल्या तरूणांनी आपल्या नांवाची नोंद आपल्या क्षेत्रातील नियुक्त मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन कोरपावली ग्रामपंचायतचे सरपंच विलास अडकमोल यांनी केले आहे.

 

Protected Content