कोरोनावर उज़्मा बहुउद्देशीय संस्थेतर्फे ध्वनिचित्र फितीच्या माध्यमातून मार्गदर्शन

जळगाव, प्रतिनिधी । येथील उज्मा बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘ चला,जीवन जगूया.. कोरोना सोबत’ या मोहिमेअंतर्गत कोरोनाबाबत जनजागृतीसाठी करण्यात येत आहे. यात विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर ध्वनिचित्र फितीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी त्यावरील उपाययोजना,उपचार, निगा व खबरदारी या संदर्भात मार्गदर्शनपर माहिती देणार आहेत. यात मुंबईचे सुप्रसिद्ध फुफुस रोगतज्ञ डॉ.जलील पारकर, सैफी हॉस्पिटलचे न्युरो सर्जेन डॉ फारूक लोखंडे, जसलोक हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर इंटेनसिविस्ट डॉ. खालिद अंसारी, चेस्ट फिजिशियन डॉ. शाहीद पटेल, पोद्दार आयुर्वेदचे एचओडी डॉ. बालाजी सावंत जळगाव येथील बालरोगतज्ञ डॉ. राजेश पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ. विलास भोळे, बालरोगतज्ञ डॉ. माजीद खान, अस्थिरोग तज्ञ डॉ. अनिस शेख, आयुर्वेदाचार्य डॉ. अमित चौधरी, नागपूर येथील इंटर्वेनशनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ. समीर अरबट, मालेगांव मंसुरा कॉलेजचे प्रोफेसर डॉ. अब्दुल इरफान अंसारी व कान नाक घसा तज्ञ डॉ. मोहम्मद आमिर , पुणे येथील आयुर्वेदाचार्य डॉ. शंतनु जोशी ,धुळे येथील होमिओपॅथी तज्ञ डॉ. सलीम शेख, हैदराबाद यथील मुफीद वेलनेस सेंटरचे मोहम्मद मुफिद खान व आहार तज्ञ जावेद अजीज सहभाग घेतील. तसेच शहरातील विविध ठिकाणी कोरोना मार्गदर्शन केंद्र सुरू केले जातील. या केंद्रांमार्फत कोरोना बाधित रुग्ण आणि सामान्य नागरिकांचे समुपदेशन करून योग्य तो सल्लाही दिला जाईल. त्याचप्रमाणे शहरातील हॉट स्पॉट असलेल्या ठिकाणी कोरोना विषयीचे जन जागृतीपर भित्तिचित्रे लावण्यात येऊन आणि हस्तपत्रके वाटून त्यातून लोकांचे प्रबोधन केले जाणार आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जाणीव व जागृती निर्माण करून कोरोनावर मात करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जाणार आहे अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अल्तमश हसन शेख यांनी दिली आहे.

Protected Content