जळगावात अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । मेहरूण परिसरात  अनोळखी ६० ते ६५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन एमआयडीसी पोलीसांनी केले आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, शहरातील मेहरूण परिसरात गुरूवार ६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका अनोळखी ६० ते ६५ वर्षीय पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला होता. एमआयडीसी पोलीसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी याबाबतची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला कळवली.  एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणी अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर अनोळखी मृतदेह सामान्य रुग्णालयात दाखल असून नातेवाईकांचा शोध सुरु आहे. सदर मयत इसमाचा रंग सावळा असून उंची 5 फुट 8 इंच आहे. शरीरयष्टी सतपातळ असून अंगात राखाडी रंगाचे स्वेटर, निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. अनोळखी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन एमआयडीसी पोलीसांनी केले आहे.

 

Protected Content