मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | चाळीसगावाहून भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शहरातील ओझर ते पातोंडा रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगावाहून भडगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या छोटा हत्ती या मालवाहू गाडीच्या (क्र. एम.एच.१९ सीवाय ५८२५) धडकेत दुचाकीस्वार (क्र.एम.एच.१९ सीएस ४३५६ ) जागीच ठार झाल्याची घटना काल सायंकाळी ६:४५ वाजताच्या सुमारास शहरातील ओझर ते पातोंडा रस्त्यावर घडली आहे. या भिषण अपघातात पितांबर आनंदा पाटील (वय-६३) रा. बोरखेडा ता. चाळीसगाव याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटना घडताच छोटा हत्तीवरील अज्ञात चालक (नाव गाव माहीत नाही) पसार झाला. याप्रकरणी अनिल दयाराम पाटील रा. बोरखेडा यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३०४(अ), २७९, ३३७, ४२७, १८४ व १३४(ब) प्रमाणे रात्री उशिराने अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Protected Content